Breaking News
प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांनी ताब्यात
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून आज दुपारी ताब्यात घेतले असून पोलिस कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. प्रशांत कोरटकरला उद्या कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडीत यांनी दिली.
प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिस गत 25 फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सोमवारी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतले. तेलंगणात त्याच्या अटकेची योग्य ते सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले जाईल. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला तिथे आणले जाईल.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant