Breaking News
कोळसा उत्पादनात देशाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, पंतप्रधानांनी केले कौतुक
नवी दिल्ली - आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक चालना देणारा घटक म्हणजे कोळसा हे खनिज. कोळशाचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी तसेच अनेक उद्योगांमध्ये इंधन म्हणून केला जातो. कोळसा हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी मुख्य ऊर्जा स्रोत आहे. देशाने गेल्यावर्षात 2023-24 (एप्रिल 2023 ते मार्च 2024) मध्ये 99.783 कोटी टन कोळसा उत्पादन केले होते. चालू आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा विक्रम मोडीत निघाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात या 20 मार्च रोजी देशाने एक अब्ज टन (BT) उत्पादनाचा टप्पा पार केला. गेल्या आर्थिक वर्षात 997.83 दशलक्ष टन (MT) कोळसा उत्पादन झाले होते. विशेष म्हणजे उत्पादनाचा हा रेकॉर्ड गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 दिवस आधीच झाला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत भारताच्या कोळसा आयातीत 8.4% घट आली आहे. यामुळे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 5.43 अब्ज डॉलर्स म्हणजे 42,315.7 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar