Breaking News
Parle ग्रुपवर आयकर विभागाकडून छापेमारी
मुंबई - आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या रेट्यातही भारतीय बाजारपेठेत खंबीरपणे पाय रोवून उभ्या असल्या Parle कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयावर आज आयकर विभागाने छापा मारला. आयकर विभागाच्या फॉरेन असेट युनिट आणि मुंबईच्या इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंगच्या वतीने ही कारवाई केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, करचोरी प्रकरणात पार्ले ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आयकर विभाग कागदपत्रांची छाननी सुरु आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पार्ले-जी बिस्किटने 2023-24 या आर्थिक वर्षात चांगला नफा कमावला. हा नफा FY24 मध्ये दुप्पट होऊन 1,606.95 कोटी झाला आहे, जो FY23 मध्ये 743.66 कोटी होता. गेल्या आर्थिक वर्षात पार्ले बिस्कुलचे परिचालन उत्पन्न दोन टक्क्यांनी वाढून 14,349.4, कोटी रुपये झाले आहे. महसुलाबद्दल बोलायचं गेल्यास तो 5.31 टक्क्यांनी वाढून 15,085.76 कोटी रुपये झाला आहे. या आकडेवारीवरून पार्ले बिस्किटाची मागणी अजूनही जोरात असल्याचे दिसून येतं.
पारले ग्रुप Parle-G, मोनॅको आणि इतर ब्रँडच्या नावे बिस्किटांचं उत्पादन करणारी कंपनी आहे. पार्ले कंपनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी 1929 मध्ये सुरु झाली. 1990 च्या दशकात चहा आणि पार्ले बिस्किट ही जोडी प्रसिद्ध होती. पार्लेने 1938 मध्ये पार्ले-ग्लुको या नावाने बिस्किटांचे उत्पादन सुरू केले. स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जीला ग्लुको बिस्किट म्हणून ओळखले जात असे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे