Breaking News
अमेझॉनची महाराष्ट्रात ८.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक …
नवी दिल्ली - अमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनी महाराष्ट्रात आपल्या विविध क्षेत्रातील कामकाज वाढविणार आहे. २०३० पर्यंत ही कंपनी महाराष्ट्रात किमान ८.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक क्लाऊड मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि कॉम्प्युटिंग फॅसिलिटीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
वैष्णव यांनी असेही सांगितले की, अमेझॉन भारतात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. अशा परिस्थितीत भारतात रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे. अमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आणि देशातील विविध भूभागात कोणते उपक्रम हाती घेण्यात येणार आहे त्याबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये ८.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
अमेझॉन कंपनी भारताबाबत आशावादी आहे. त्यामुळे ही कंपनी भारतात गुंतवणूक करणार आहे. अमेझॉन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीला आवश्यक असे कुशल मनुष्यबळ भारतातील विविध राज्यात उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही भारतामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहोत. यामुळे भारत आणि भारतातील कर्मचाऱ्यांबरोबरच कंपनीचे कामकाज वाढण्यास मदत होते असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar