Breaking News
मोहोळ कृषी संशोधन केंद्राने शोधले खास लाह्यासाठी ज्वारीचे वाण
मोहोळ - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्र येथे ज्वारीचे लाह्यासाठी विशेष वाण विकसित करण्यात आले आहे. फुले पंचमी असे या वाणाचे नाव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र मोहोळ येथील संशोधन केंद्रात कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी काम केले जाते. या संशोधन केंद्रात खास लाह्यासाठी फुले पंचमी या वाणाची निर्मिती करण्यात आली आहे. हा वाण रब्बी ज्वारी लावणाऱ्या शेतकऱ्यांनी हा वाण लावायला काहीही हरकत नाही. हा वाण कोरडवाहू असल्याने हा वाण अधिकाधिक उत्पादन देऊ शकतो. अशी माहिती डॉ. व्ही. आर. पाटील असिस्टंट प्रोफेसर महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी दिली आहे.
या वाणाचे लाह्या 100 ग्रॅम तयार करण्यासाठी घेतल्यास 95 टक्के लाह्या तयार होतात आणि 5 टक्के लाह्या फुटत नाहीत. हा वाण लाह्या उद्योगासाठी उत्कृष्ट वाण आहे. फुले पंचमी हा वाण रब्बी हंगामात 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत लावला तर उत्तम पद्धतीने हा वाण येतो. तसेच हा वाण कोरडवाहूमध्ये चांगल्याप्रकारे उत्पादन देऊ शकतो.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar