Breaking News
२४ ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुक उमेदवारांची बैठक…
जालना - २४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता इच्छुक उमेदवारांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. राज्यातील 23 जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसोबत मनोज जरांगे चर्चा करणार आहेत.
मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केली असून ज्या मतदार संघात आपला उमेदवार निवडून येईल येईल त्या मतदार संघात आपण उमेदवार उभा करू अशी भूमिका जरांगे यांनी घेतलीय. त्या अनुषंगाने मनोज जरांगे येत्या २४ तारखेला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे कोणत्या मतदार संघात उमेदवार उभे करतात हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.
संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, लातुर, धाराशिव, बीड, जळगाव, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, सोलापुर अ.नगर, नाशिक, अमरावती, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे रायगड, ठाणे आणि नागपूर या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना 24 ऑक्टोबर च्या बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar