Breaking News
हा पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास राज ठाकरेचा सक्त विरोध
मुंबई - “द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी सिनेमाला महाराष्ट्रात प्रवेश देणं महागात पडेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. फवाद खानचा हा चित्रपट भारतात लवकरच प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट प्रदर्शित होईल त्याच सुमारास नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात कोणताही संघर्ष होऊ नये, अशी माझी इच्छा आहे’, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवर लिहिले की, ‘फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा,’लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा चित्रप लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?’असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ आता भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक बिलाल लशारी आणि माहिरा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हे अपडेट शेअर केले. यानंतर राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar