मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अष्टपैलू क्रिकेटपटूची अखेर

भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू अजित वाडेकर यांच्या जाण्यानं क्रिकेटचा सच्चा मार्गदर्शक हरपला आहे. वाडेकर यांची क्रिकेटमधील कारकिर्द उल्लेखनीय राहिली. आठ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अजित वाडेकर यांना 37 सामने खेळण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी 2113 धावा काढल्या. त्यामध्ये एक शतक आणि 34 अर्धशतकांचा समावेश होता. खरं तर वाडेकर यांना इंजिनिअर व्हायचं होतं. एकदा ते सहकारी बाळू गुप्ते यांच्यासह बसमधून कॉलेजला जात होते. बाळू गुप्ते हे कॉलेजच्या क्रिकेट संघात खेळत होते. त्यांनी अजित वाडेकर यांना ‘तू कॉलेजच्या संघातील 12 वा खेळाडू होशील का’ असा प्रश्‍न विचारला. मित्राच्या या प्रश्‍नाला होकार दर्शवत वाडेकर कॉलेजच्या क्रिकेट संघात सहभागी झाले. त्यानंतर सुनिल गावसकरचे काका माधव मंत्री यांनी अजित वाडेकरमधील प्रतिभा हेरली. पुढे मंत्री यांच्याच सांगण्यावरून वाडेकर यांना भारतीय संघात सहभागी होण्याची संधी मिळाली. 1971 मध्ये वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कि‘केट संघानं वेस्ट इंडिजचा दौरा केला. यातल्या पहिल्या सामन्यात भारताने दिलीप सरदेसाईच्या द्विशतकाच्या सहाय्याने वेस्ट इंडिजवर ङ्गॉलो ऑन लादला. अर्थात, हा सामना अनिर्णित राहिला. दुसर्‍या सामन्यात भारतानं सरदेसाईंच्या शतकाच्या सहाय्याने वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव केला. पुढील तीन सामने अनिर्णित राहिल्यामुळे भारतानं ही मालिका 1-0 अशी जिंकली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हा भारतीय क्रिकेट संघाचा परदेश दौर्‍यातील पहिला विजय होता. याच वर्षी भारतीय क्रिकेट संघ अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला होता. या दौर्‍यातही भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडचा 2-0 असा पराभव केला.

भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कप्तानामध्ये अजित वाडेकरांची गणना होत असे. ते उत्तम ङ्गलंदाज तसंच कुशल यष्टीरक्षक होते. त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द आठ वर्षांची राहिली. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतले भारतीय संघाचे पहिले कप्तान म्हणूनही अजित वाडेकरांचं योगदान महत्त्वाचं राहिलं.1990 च्या दशकात मोहम्मद अझरूद्दीन यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचे मॅनेजर म्हणूनही त्यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली. या काळात अझरूद्दीन तसंच अनिल कुंबळेच्या कि‘केट कारकिर्दीला संजीवनी देण्याचं काम वाडेकर यांच्याकडून झालं. नंतर वाडेकर यांनी निवड समितीचं अध्यक्षपदही भूषवलं. सचिन तेंडूलकरवरही अजित वाडेकर यांचा प्रभाव राहिला आहे. किंबहुना, सचिन तेेंडुलकरला आघाडीचा ङ्गलंदाज बनवण्यात वाडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

डावखुरा असलेल्या अजितची क्रिकेट खेळण्याची विशिष्ट शैली होती. त्यामुळे त्याचा खेळ नेहमीच क्रिकेट शौकीनांना समाधान देणारा, नेत्रसुखद असा ठरे. संघाची गरज आणि सामन्यातील परिस्थिती लक्षात घेऊन खेळणं, ही अजित वाडेकरची खासियत होती. आक्रमक ङ्गटकेबाजी हे तर त्याचं वैशिष्ट्य होतंच. शिवाय संघासाठी किल्ला लढवण्याची क्षमताही त्याच्याकडे होती. संघाच्या व्यवस्थापकपदाची धुरा वाहताना तसंच निवड समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना वाडेकरने अनेक खेळाडूंना संधी दिली. त्याच बरोबर वाडेकरच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंची जडणघडण झाली. भारतीय क्रिकेटला अनेक गुणी क्रिकेट खेळाडू देण्यात वाडेकरचं योगदान महत्त्वाचं राहिलं. खरं तर भारतीय क्रिकेटला विजयाची मालिका साकारण्याची सवय वाडेकरने लावली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काहीसं मितभाषी असं हे व्यक्तिमत्त्व होतं. त्याच बरोबर तो मिश्किल स्वभावाचा होता. गप्पांमध्ये विनोद करून उपस्थितांची हसून हसून पुरेवाट करणं, त्याला सहज जमत असे. पुण्यात माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला मुुंबईहून बापू नाडकर्णी, सचिन तेंडूलकर यांच्यासह अजित वाडेकरचीही उपस्थिती होती. त्यावेळी त्याने मला भरभरून शुभेच्छा दिल्या. आम्ही वेळोवेळी ङ्गोनवर बोलत असू. आता अशा गप्पा होणार नाहीत, याची मोठी खंत वाटत असून ती उणीव कायम राहणार आहे.   

अजित वाडेकर यांच्या कारकिर्दीतील काही बाबी इतक्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत की, त्या बाबतीत विराट कोहली, धोनी, रोहित शर्माच नव्हे तर कोणताही भारतीय खेळाडू त्याची बरोबर करू शकणार नाही. वाडेेकर हे पहिल्या एकदिवसीय भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान होतेच, शिवाय एकदिवसीय सामन्यात अर्धशतक करणारे पहिले भारतीय ङ्गलंदाजही होते. अजित वाडेकर एकदिवसीय क्रिकेट संघाचे पहिले कप्तान होते तर सचिन तेंडूलकर भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे तेरावे कप्तान राहिले. याबाबत धोनीचा 19 वा क्रमांक आहे तर विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट संघाचा बाविसावा कप्तान राहिला आहे. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने लागोपाठ तीन मालिका जिंकल्या होत्या. यातली एक मालिका वेस्ट इंडिजमध्ये, दुसरी इंग्लडंमध्ये तर तिसरी इंग्लंडविरूध्द भारतात खेळली गेली होती. आणखी एक विशेष म्हणजे वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने वेस्ट इंडिजमध्ये जिंकलेल्या सामन्याद्वारे सुनिल गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सुनिल गावसकर, गुंडाप्पा विश्‍वनाथ, ङ्गारूख इंजिनिअर, बिशनसिंग बेदी, प्रसन्न, चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन अशा एकाहून एक सरस खेळाडूंचा समावेश असलेल्या क्रिकेट संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी वाडेकर यांना लाभली. ेक्रिकेटपटू, क्रिकेट संघाचे कप्तान, संघाचे मॅनेजर तसंच निवड समितीचं अध्यक्षपद अशा जबाबदारीच्या विविध पदांवर काम केलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये अजित वाडेकर यांचा समावेश होतो. त्यांचं अवघं जीवन जणू क्रिकेटमय झालं होतं. क्रिकेट हेच त्यांचं मुख्य ध्येय आणि विश्‍व होतं. 

असं असलं तरी 1974 मध्ये वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या दौर्‍यात पराभव पत्करावा लागला. या पराभवाला ‘समर ऑङ्ग 42’ असं म्हटलं जातं. याचं कारण या दौर्‍यात भारतीय संघानं लॉर्डसवरील सामन्यात  सर्वात कमी धावा केल्या होत्या. या पराभवामुळे अजित वाडेकर यांना टीकेचा तसंच विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कप्तानपद सोडण्याची तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी मॅनेजर म्हणून दुसर्‍यांदा योगदान दिलं. यावरून त्यांची क्रिकेटवरील प्रेम तसंच निष्ठा दिसून आली. मुख्त्वे अजित वाडेकर यांनी भारतीय क्रिकेटला जगभरात वेगळी ओळख मिळवून दिली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

भारतीय क्रिकेटमधील बहुमूल्य योगदानाबद्दल अजित वाडेकर यांना 1967 मध्ये अर्जून पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिवाय बीसीसीआयद्वारे त्यांना सी. के. नायडू लाईङ्गटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलं होतं. अशा या भारतीय क्रिकेटमध्ये अद्वितीय योगदान देणार्‍या गुणी खेळाडूची उणीव जाणवत राहणार आहे. वैयक्तिकरित्या एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांना विनम्र श्रध्दांजली.

निष्णात क्रिकेटपटू 

अजित वाडेकर आणि मी  एकत्र खेळलो होतो. व्यक्तिश: आमची चांगली मैत्रीदेखील होती. सण-समारंभाच्या, वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आवर्जून एकमेकांना शुभेच्छा देत असू. या शिवाय आमच्यामध्ये विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण होत असे. अजित वाडेकरचा स्वभाव विनोदी होता. तसंच तो सर्वांमध्ये मिळून-मिसळून वावरत असे. मुंबई क्रिकेट संघाच्याच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघाच्या वाटचालीत त्याचं मौल्यवान असं योगदान राहिलं. वाडेकरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज तसंच इंग्लंड संघाविरूध्द विजय मिळवला होता. तो क्रिकेटमध्ये कार्यरत असताना या खेळाचा प्रकाश होता, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्यानं भारतीय क्रिकेटला संदीप पाटील, विजय मांजरेकर यासारखे कुशल खेळाडू दिले. या जिमखान्याच्या प्रमुखपदाची धुरा अजित वाडेकरने सांभाळली होती. या काळातही खेळाडूंसाठी त्याचं मार्गदर्शन उपयुक्त ठरलं. वाडेकरने सामाजिक कार्यासाठी दिलेलं योगदानही महत्त्वाचं राहिलं. तो एक कॅलक्युलेटेड प्लेअर होता. त्याचा भारतीय कि‘केट संघाला निश्‍चित ङ्गायदा झाला. विशेषत: सामन्यात भारताच्या दृष्टीने परिस्थिती बिकट असायची तेव्हा तो मैदानावर टिच्चून राहण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यात त्याला यशही यायचं. त्याची ङ्गलंदाजी उत्तम होती. अजित उत्तम कप्तानही होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरूध्दची मालिका जिंकली तेव्हा या संघाचं भारतात झालेलं स्वागत अभूतपूर्व आणि अविस्मरणीय ठरलं. संघातल्या सर्व खेळाडूंची मुंबई विमानतळापासून सजवलेल्या उघड्या बसवरून मिरवणूक काढण्यात आली होती. मार्गात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या विजयाने अवघ्या देशातल्या क्रिकेटला चैतन्य मिळालं होतं. अशा या निष्णात क्रिकेटपटूच्या जाण्यानं  झालेली कि‘केटक्षेत्राची हानी भरून येण्यासारखी नाही.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट