Breaking News
‘पर्यटकांनो परत जा’ पर्यटनाच्या अतिरेकाला कंटाळले युरोपीय देशांतील नागरिक
मुंबई - जगभरात पर्यटन व्यवसाय वाढल्याने अनेक देश आंतरराष्ट्रीय पर्यंटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखत आहेत. युरोपातील देशांना भेट देण्यासाठी पर्यंटक मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात. मात्र आता या देशांत प्रचंड संख्येने पर्यटक येत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्रस्त होईन ‘पर्यटकांनो परत जा’ असा नारा दिला आहे. मध्यंतरी स्पेन, इटलीपुरतेच दिसून आलेले हे आंदेलन संपूर्ण युरोपमध्ये पसरायला वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे
अनेक शहरांच्या लोकसंख्येपेक्षा पर्यटकांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी, प्रत्येक ठिकाणी गर्दीचा सामना करावा लागतो. अशा स्थितीमुळे बार्सिलोनाच्या लोकांच्या मनात विस्थापित झाल्याची भावना निर्माण झाली आहे, त्यांचे शहर आणि त्याची ओळख त्यांच्यापासून हिरावून घेतली गेली आहे, ही भावना जन्माला येत आहे, असे युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. व्हेनिस, रोम, ॲमस्टरडॅम, फ्लॉरेन्स, बर्लिन, लिस्बन, पाल्मा डी मॅलोर्का आणि युरोपमधील इतर ठिकाणी पर्यटकांच्या अतिओघाने तेथील स्थानिकांना ‘ट्युरिस्मोफोबिया’ने पछाडले असल्याचे अनेक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पर्यटनामुळे येथील जनजीवन अस्थिर केले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वाढत्या पर्यटकांमुळे मूळ स्थानिकांना पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवांवर परिणाम तर होत आहेच. शिवाय महागाईचाही सामना त्यांना करावा लागत आहे.
अनेक पर्यटक केवळ पार्ट्या करण्यासाठी शहरांना भेटी देतात. स्पॅनिश लोकांनी वर्षानुवर्षे तक्रार केली आहे की, पर्यटक जास्त प्रमाणात मद्यपान करतात, कचरा करतात, भांडण करतात आणि अगदी नग्न होऊन रस्त्यावर धावतात. ज्याचा परिणाम पर्यावरणावर होतोच परंतु सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन विस्कळीत होते. शिवाय पर्यटकांसाठी कोच बस, टुरिस्ट शॉप्स, नवीन हॉटेल आणि अल्प-मुदतीसाठी भाड्यावर दिल्या जाणाऱ्या अपार्टमेंटचे दर वाढवले जात असल्याने स्थानिकांना त्याच गोष्टींसाठी विनाकारण जास्तीचा मोबदला द्यावा लागतो.
युनेस्कोच्या मते, स्थानिक आणि प्रवाशांची आवड, हित हे यांचे संतुलन आवश्यक आहे. त्यासाठी त्यांंनी ‘क्वालिटी ओव्हर क्वांटिटी’ पर्यटनाचा उपाय सुचवला आहे. जास्त पर्यटक भेट देणाऱ्या शहरांनी उत्तमोत्तम (लग्झुरिअस) सोयीच पुरविण्यावर भर द्यायचा. या सोयीसुविधा केवळ सढळ हाताने खर्च करणाऱ्या किंवा महागड्या सेवा परवडणाऱ्यांसाठीच असल्याने पर्यटकांची संख्या आपोआप कमी होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar