मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्य सरकारची द्विवर्षपूर्ती आणि आव्हान

राज्य सरकारची द्विवर्षपूर्ती आणि आव्हान

             शिवसेनेतील फुटीला आणि राज्यातील नव्या सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षादरम्यान अनेक राजकीय घडामोडी होऊन महाराष्ट्राचे सर्व रुपडे पालटले आहे. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या सर्व घडामोडींवर एक पोस्ट लिहिली आहे. दोन वर्षांपूर्वी जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील १६ आमदारांसह गुजरातच्या सुरत शहरात कसे गेले आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली हे लिहिले आहे. त्यानंतर पक्षातील आणखी २४ आमदार त्यांना जाऊन मिळाले. पाठोपाठ शिंदे गुवाहाटी (आसाम) शहरात गेले. गुवाहाटीत काही वाटाघाटी केल्यानंतर ते मुंबईत परतले आणि त्यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला. तसेच भाजपाबरोबर हातमिळवणी करून राज्यात सत्तास्थापनही केली. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. 

               गत दोन वर्षांत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये परस्परांवर कुरघोडीचे अनेक प्रयत्न झाले. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. तसेच यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव बदलून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना असे नाव निवडणूक आयोगाने दिले. तसेच त्यांना मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. तसेच या दोन वर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपाने फूट पाडून दोन गट निर्माण केले. यात अजित पवारांनी राजकीय हालचाली करत बंडखोरी केली. शरद पवार स्थापित राष्ट्रवादी पक्षातील बहुतांश आमदार अजित पवारांना मिळाल्यानंतर झालेल्या वादात निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह घड्याळ दिले. अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी केली. राज्यात अशाप्रकारे दोन प्रादेशिक पक्ष फुटून बंडखोर गट राज्याच्या सरकारमध्ये सामील झाले.  

                 एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीबद्दल म्हटले आहे की, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत.

दोन वर्षांपूर्वी जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांसह बंडखोरी करत आपला वेगळा गट निर्माण केला. शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार कोसळले. राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण होत भाजपाच्या पाठींब्याने एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापन केली. या घटनेला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आपले विचार व्यक्त करताना म्हटले आहे, विचार, विकास आणि विश्वास ही त्रिसूत्री राबवत राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे.

                   शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भक्कम पाठबळ लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. राज्यातील जनतेने दिलेले प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे. मुख्यमंत्र्यानी राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली असली तरी राज्य सरकार व विरोधकांचा बराचसा वेळ स्वतःच्या पक्षांचे अस्तित्व निर्माण करण्यात आणि न्यायालयीन लढाई लढण्यात गेला, हे मान्य करावे लागेल.  

                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी म्हटले की,  आम्हाला विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे, तरी त्याला बराच अवधी लागेल असे वाटते. कारण शिंदे गट शिवसेनेला आपल्याच पूर्वीच्या मूळ पक्षाशी संघर्ष करण्यात दीड वर्ष लागली. तोवर लोकसभेची निवडणूक आली. त्यांच्या व ठाकरे गट शिवसेनेला सदर निवडणुकीची योग्य तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. अजित पवार गट राष्ट्रवादीची तर लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाली. म्हणावे असे यश मिळाले नाही. आता राज्य सरकारच्या कामाला सूर लागेल अशी चिन्हे आहेत. येत्या काही महिन्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीत पक्षनेतृत्वाला लक्ष घालावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्यासमोर पक्ष एकजुटीने ठेवण्याचे व आगामी निवडणुकीत यश मिळवण्याचे आव्हान आहे.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट