अजून एका खेळाडूने केली आत्महत्या

         राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायका हिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. राहत्या वसतिगृहात कोनिका हिने गालफास लावून आत्महत्या केली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने कोनिकाला तिच्या खेळासाठी रायफल भेट दिली होती. २६ वर्षीय कोनिका लायक झारखंडच्या धनबादची रहिवासी होती. नुकतेच खेळविश्वामधे पदार्पण करणाऱ्या या खेळाडूच्या निधनाने क्रीडा जगताला धक्का बसला आहे.

         माजी ऑलंम्पियन आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त जयदीप कर्माकर यांच्यासोबत कोनिका कोलकाता येथे प्रशिक्षण घेत होती, कोनिका हि एक उत्तम नेमबाज पटू होती, अनेक स्पर्धांमध्ये  ती नेमबाजीसाठी आपल्या मित्रांच्या किंवा सहकाऱ्यांच्या रायफलीचा वापर करायची. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांना याबद्दल समजताच त्यांनी, कोनिकाच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन म्हणून नविन रायफल भेट दिली होती. नवोदित खेळाडूच्या अश्या आत्महत्येमुळे क्रीडा जगतामध्ये खळबळ झाली आहे. तूर्तास तरी कोनिकाच्या आत्महत्ये मागचं कारण समजलं नाही आहे. 


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट