भारताने न्यूझीलंडचा ६२ धावांमध्येच बस्ता बांधला.

        भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. एकीकडे मुंबईकर एजाजने एकाच डावात भारताचे १० फलंदाज बाद केले. तर दुसरीकडे भारताने याला प्रतिउत्तर म्हणून न्यूझीलंडला ६२ धावांमध्येच गुंडाळले. एजाजने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. पुढे भारताने सुद्धा गोलंदाजीची कमाल दाखवत न्यूझीलंड संघाला ६२ डावांमध्ये पुन्हा त्यांच्या तंबूत माघारी पाठवले. अवघ्या दोन तासांतच भारतीय गोलंदाजाने आपली कामगिरी दाखवली. अश्विनने सर्वाधिक ४ विकेट, मोहम्मद सिराजने ३, अक्षर पटेलने २ तर जयंत याने १ विकेट घेतली. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट