मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पालिकेचे ‘स्वच्छतेचे पुढचे पाऊल’

15 ऑगस्ट ते 31 एप्रिल कालावधीत 3 टप्प्यात करणार सर्वेक्षण

नवी मुंबई ः अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘निश्चय केला नंबर पहिला’ हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ करिता आजपासून सर्व नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असल्याचे जाहीर केले.

75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित ‘स्वच्छतेचे पुढचे पाऊल’ या कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त आपले मनोगत व्यक्त करीत होते. फेसबुक लाईव्ह व यू ट्युब लाईव्ह व्दारे अनेक नवी मुंबईकर नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केवळ इच्छ़ा म्हणून आपण देशातील सर्वात स्वच्छ शहर बनणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलेले नाही तर आपल्या शहरामध्ये ती क्षमता आहे. यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील आहेच तथापि नागरिकांच्या संपूर्ण सहभागाशिवाय ते शक्य नाही हे स्पष्ट करीत नागरिकांनी घरातील दररोज निर्माण होणारा कचरा ओला, सुका व घरगुती घातक अशा प्रकारे वेगवेगळा करावा, त्यासाठी वेगवेगळे डबे ठेवावेत व महानगरपालिकेच्या स्वच्छतामित्रांकडे तो कचरा वेगवेगळा द्यावा. केवळ एवढेच केले तरी स्वच्छतेचे 90 टक्के उद्दिष्ट साध्य होईल असे सांगत नवी मुंबईकर नागरिक ते करतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. कचरा वर्गीकरण ही सर्वात महत्वाची बाब असून ज्या सोसायट्या वर्गीकरण केलेला कचरा देणार नाहीत त्यांचा कचरा उचलला जाणार नाही हे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मधील काही उल्लेखनीय उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. याप्रसंगी मलनि:स्सारण विषयक काम करणार्‍या 8 सफाईमित्रांचा तसेच शौचालय व्यवस्थापनाचे काम करणार्‍या 8 स्वच्छतामित्रांचा आयुक्तांच्या हस्ते शाल व वृक्षरोपे प्रदान करून सन्मान करण्यात आला.

  • नवीन योजना
    झोपडपट्टी भागातील कचर्‍याची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणारे ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ सर्वच झोपडपट्टी भागात राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे झिरो वेस्टची ही संकल्पना गांव-गांवठाण व सेक्टर भागातही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील काही रस्त्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवण्याकरिता ‘रस्ते दत्तक योजना’ राबविण्याची अभिनव संकल्पना आयुक्तांनी जाहीर केली. या माध्यमातून स्थानिक नागरिकांचा स्वच्छतेवर राहणारा वॉच तो परिसर आणि शहर स्वच्छतेसाठी मोलाचा ठरेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
  • 3 टप्प्यात सर्वेक्षणाची कार्यवाही
    सर्वसाधारणपणे 2 ऑक्टोबरपासून स्वच्छ सर्वेक्षणाला सुरूवात होत असली तरी स्वच्छता ही सातत्यपूर्ण बाब असल्याने आपण अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनासारखा उत्तम दिवस निवडून स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची तयारी सुरू करीत असल्याचे सांगत आयुक्तांनी 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी ते एप्रिल अशा 3 टप्प्यात सर्वेक्षणाची उंचावत नेणारी कार्यवाही करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी जाहीर केले.  
  • स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाकडेही लक्ष
    40 हजार वृक्षलागवडीतून एमएमआर क्षेत्रातील सर्वात उत्तम अशा मियावाकी स्वरूपाच्या जंगलाची कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात निर्मिती करण्यात आली. इको सिटी म्हणून ओळख दृढ करण्यासाठी ई बसेसला प्राधान्य दिले. शहरातही पर्यावरणशील वाहनांचा वापर वाढण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करताना त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी पहिल्या चार्जींग स्टेशनचे लवकरच लोकार्पण करण्यात येत आहे. तसेच 8 महिन्यात 20 चार्जींग स्टेशन सुरू करण्याचे तसेच आणखी 20 चार्जींग स्टेशन उभारण्याचे प्रस्तीवित असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. केवळ नागरिकांना आवाहन करण्यापुरते मर्यादीत न राहता याची सुरूवात महानगरपालिकेपासूनच करण्याच्या दृष्टीने यापुढे महानगरपालिकेमार्फत घेण्यात येणारी वाहने इलेक्ट्रिकल घेण्यात येतील असेही आयुक्तांनी जाहीर केले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट