मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कोरोनावरील दोन लसींच्या मिश्रणाचा डोस अधिक प्रभावी

नवी दिल्लीः भारतात तयार होणाीया कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या मिश्रणाचा डोस घेतल्यास कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी जादा प्रतिपिंडं तयार होतात आणि कोरोनावर मात करण्यासाठी हा मिश्र डोस जास्त प्रभावी ठरतो, असा निष्कर्ष केंद्रीय वैद्यकी संशोधन परिषदे (आयसीएमआर)ने जाहीर केला आहे.  

कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचा मिश्रित डोस कोरोनापासून चांगलं संरक्षण प्रदान करतो. आयसीएमआरच्या मते, ऍडेनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म लस आणि निष्क्रिय होल व्हायरस लसीचा मिक्स डोस घेणं सुरक्षित आहे. या दोन लसींचे वेगवेगळे डोस एकाच लसीच्या दोन डोसपेक्षा चांगली प्रतिकारशक्ती देतात. कोरोना लस मिक्सिंगचा हा अभ्यास आयसीएमआरने केला. डीजीसीआयच्या तज्ज्ञ पॅनेलने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या मिश्र डोसच्या अभ्यासाची शिफारस केली होती. यानंतर वेल्लोर इथल्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये लसीच्या मिक्स ट्रायल डोसची परवानगी देण्यात आली. मिश्र डोस घेतलेल्या लोकांमध्ये अधिक प्रतिपिंडं तयार झाली. हा अभ्यास तीन गटांमध्ये विभागला गेला. प्रत्येक गटात 40 लोकांचा समावेश होता. लसीकरणानंतर, सर्व गटांमधल्या लोकांच्या सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती प्रोफाइलची तुलना करण्यात आली.

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा मिश्रित डोस घेणार्‍या लोकांमध्ये कोरोनाच्या अल्फा, बीटा आणि डेल्टा प्रकारांविरुद्ध लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती होती. अभ्यासात आढळून आलं की दोन लसींचा मिश्र डोस घेतलेल्या लोकांमध्ये समान लसीचे दोन डोस घेणार्‍यांपेक्षा जास्त प्रतिपिंडं तयार होतात. आयसीएमआरचे एपिडेमिओलॉजी आणि संसर्गजन्य रोग प्रमुख डॉ. सिमरन पांडा म्हणाले की अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांना न सांगता वेगळ्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लोकांना लसीच्या दुसर्‍या डोसबद्दल भीती वाटू नये, त्यासाठी हे केलं गेलं. मिश्र डोस गटात 18 लोक होते. यापैकी 11 पुरुष आणि 7 महिला होत्या. त्यांचं सरासरी वय 62 वर्षं होतं. त्यापैकी दोन जण नंतर चाचणीतून बाहेर पडले. त्याच वेळी, एकाच लसीच्या दोन्ही डोससह गटात समाविष्ट 40 लोकांपैकी एका व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाब दिसून आला. तज्ज्ञ या अभ्यासाच्या परिणामांमुळे समधानी आहेत; परंतु ते अधिक सखोल आणि तपशीलवार संशोधनाची आवश्यकता दर्शवतात.

  आरोग्यतज्ञ डॉ.समीर भाटी म्हणाले, या अभ्यासामध्ये फक्त 18 जणांचा समावेश करण्यात आला होता. असे अभ्यास राष्ट्रीय स्तरावरही झाले पाहिजेत. भारतातल्या लोकसंख्येची विविधता लक्षात घेता, हा अभ्यास 60 ते 70 वयोगटातल्या लोकांवरही केला पाहिजे. दोन्ही लसींच्या संयोजनाचं स्पष्टीकरण देताना डॉ. भाटी म्हणतात की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही वेगवेगळ्या सूत्रांवर बनले आहेत. कोवॅक्सिनमध्ये कोरोनाचा मृत विषाणू असतो, जो रोगप्रतिकारक शक्तीला विषाणूच्या संसर्गाविरूद्ध प्रतिपिंडं विकसित करण्याचे संकेत देतो. कोविशिल्डचे विषाणू वेक्टर सूत्रावर आधारित आहेत. सामान्य सर्दीचा कमकुवत विषाणू कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी वापरला जातो. दोन्ही लसींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असली तरी दोन्हीचा मिश्रित डोस अधिक फायदेशीर ठरेल आणि लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जास्त प्रतिकारशक्ती तयार होईल. संमिश्र डोसमुळे लसीची कमतरता दूर करण्यास मदत होईल.

देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती आणि डेल्टा व्हेरिएंटच्या धोक्यात हा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मिश्रित डोस लसीच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करतील तर विविध लसींच्या डोसमधून लोकांमध्ये प्रतिकूल परिणामांची भीतीदेखील कमी होईल. देशात आतापर्यंत पाच लसींना मान्यता देण्यात आली आहे. जॉनसन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला देशात गेल्या आठवड्यातच आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यात आली आहे. कोविशील्ड, कोवाक्सिन, स्पुटनिक व्ही आणि मॉडर्नानंतर देशात आपत्कालीन वापराची मान्यता मिळवणारी ही पाचवी लस आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोनाची एकूण तीन कोटी 19 लाख 34 हजार 455 प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी सुमारे चार लाख 40 हजार लोकांनी जीव गमावला आहे. सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या चार लाख 6 हजार 822 वर आली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट