मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचे आवाहन

पनवेल : कोविडचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे, तसेच या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेऊन सतर्क राहावे. यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नियमांचे पालन करावे. यामध्ये लग्न समारंभाची मंगल कार्यालये, हळदी समारंभ, साखरपुडा, जिमखाना-क्लब, नाइट क्लब, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मीय स्थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल्स तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्वच ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्कचा वापरला नसल्याचे आढळल्यास आणि 50पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तींना दंड करण्यासोबत त्या त्या ठिकाणच्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी स्पष्ट केले. 

लग्नसोहळ्याचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करून तिथे कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले असेल, तर दंडात्मक कारवाई करून लग्नाचे आयोजक-पालक तसेच संबंधित व्यवस्थापनांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात येतील. मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करून नागरिकांनी कोरोनाला स्वत:सह कुटुंबीयांपासून दूर ठेवावे, असेही आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट