मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नातं हृदयाचं रक्तवाहिन्यांशी...

दोष निर्माण झाल्यास उद्भवू शकते ‘ही’ समस्या

हृदय आणि रक्तवाहिन्या या दोघांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो, हे सर्वांनाच ऐकीवात आहे. परंतु, या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणास्तव दोष निर्माण झाल्यास हृदयासाठी हे अतिशय घातक ठरू शकते, हे तुम्हाला माहिती आहे. हृदयाकडे रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता बिघडल्यास हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. यासाठी योग्य निदान आणि त्वरीत उपचार होणं ही काळाची गरज आहे.

हदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्‍या स्वतःच्या रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्यावेळी या रक्तवाहिन्यांची रूंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते. त्यावेळी हृदयाच्या इतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही. रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू न मिळाल्याने हृदय बंड पडू शकते. यालाच हृदयविकाराचा झटका येणं असं म्हणतात.

रक्तामध्ये फुफ्फुसांद्वारे श्‍वास घेतलेला ऑक्सिजन देखील असतो. रक्ताभिसरण प्रणाली शरीराच्या इतर पेशींमध्ये ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वितरीत करते. आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईडसह बाहेर सोडते. पाचक प्रणाली ही शरीराची एक प्रणाली आहे, जी आपल्याला अन्नाचे पचन करण्यास आणि त्यातील पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करते. यात शरीरातील पोट आणि आतड्यांसारख्या अवयवांचा समावेश आहे.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टम एकमेकांशी जोडलेले आहेत. तिघांररिंरररपैकी एकाचे कार्य जरी थांबले तरी हृदयावर त्यांचा विपरित परिणाम होऊ शकतो. यासाठी आजाराचं योग्य पद्धतीने निदान होणं आवश्यक आहे. कारण वेळीच आजाराचं निदान झाल्यास तातडीने उपचार करणं शक्य होतं. लवकरच उपचार झाल्यास हृदयविकार झटका टाळता येऊ शकतो.

वेळीच निदान व उपचार का गरजेचं आहे, जाणून घ्या पुढील लक्षणे..

1.हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत जळजळ होणं किंवा उलट्या होणं असा त्रास होऊ शकतो. बर्‍याचदा लोक अपचन (अँसिडिटी) झाल्यास मनातून घरगुती उपचार करतात. पण त्रास वाढू लागल्यावर डॉक्टरांकडे येतात. अशावेळी हृदयविकार असल्याचं समोर येतं.

2.छातीत हलके दुखणे, श्‍वास घेताना त्रास होणं, ताप आणि घबराहट होणं

3.हृदयाचा झटका येण्यापूर्वी पोटदुखी हृदयाच्या उजव्या बाजूला दुखू लागते, ही लक्षणे कालांतराने तीव्र होऊ शकतात. वारंवार पोटाच्या मध्यभागी आणि उजव्या बाजूच्या भागाजवळ वेदना होते. याशिवाय घाम येणं, मळमळणे आणि थकवा जाणवणे, ही तीन लक्षणे हृदयाच्या स्नायूमध्ये रक्ताची गुठळी होण्याची चिन्हे असू शकतात. हा त्रास वारंवार होऊ लागल्या हृदयाची काळजी घ्यावी.

4.हृदयविकारामुळे आतड्यांमधील दाब वाढल्याने भूक मंदावते. परिणामी, हृदयविकार असणार्‍या व्यक्तीचे वजन कमी झालेले दिसून येते.

5.हार्मोनल बदलांमुळे, शरीरात चरबी आणि प्रथिने कमी होत आहेत, ज्यामुळे वजन कमी होते.

6.हृदयविकाराची वेदना छाती, खांदा, बेंबीच्या वरच्या भागात, पाठीत किंवा वर जबड्यापर्यंत कोठेही जाणवते.


-डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डिओ-थोरॅसिक सर्जन सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट