मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पीसीओडीवर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान

डॉ. प्रदीप महाजन, मेडिसीन रिसर्चर - स्टेम आरएक्सचे रिजनरेटिव्ह 

तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराने पिडित आहात? तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण या आजारातून बरं होण्यासाठी स्टेम सेल थेरपी फायदेशीर ठरत आहे. मुख्यतः महिलांच्या शरीरातील हॉर्मोनल बदलांमुळे मासिक पाळी वेळेवर येतं आहे. परंतु, या थेरपीद्वारे हार्मोनल असंतुलन नियमित करण्यात मदत मिळतेय. याशिवाय पीसीओएसच्या संबंधित सर्व लक्षणांमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येत आहे.

तरुणींमध्ये ‘पीसीओएस’ ही एक समस्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे. पीसीओएस ही एक अनुवांशिक आणि हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतात. स्त्रियांमध्ये दोन बीजांडकोष(ओव्हरी) असतात जे गर्भाशयाला जोडलेले असतात. दर महिन्याला बीजांडकोष हे एक परिपक्व स्त्रीबीज निर्माण करते व त्याचबरोबर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन व एँन्ड्रोजेन या हार्मोनल अंतःस्त्रावांची निर्मितीसुद्धा करते. परंतु, पीसीओएस मध्ये महिलेच्या बीजांडकोषात स्त्रीबीज तयार होते. परंतु हे बीज फुटत नसल्याने मासिक पाळी येत नाही. अशा स्थितीत ओव्हरीमध्ये छोट्या-छोट्या सिस्ट(गाठी) तयार होतात. अशावेळी महिलेला गर्भधारण करण्यास अडचणी येतात. काही महिलांमध्ये वंधत्वाची समस्याही निर्माण होते.

पीसीओएस या समस्येवर उपचार उपलब्ध आहेत. मात्र, आता या आजारातून बरे होण्यासाठी महिलांकरिता आता स्टेम सेल थेरपी वरदान ठरू लागली आहे.

प्रत्येक महिलेला दर महिन्याला मासिक पाळी दरम्यान होणारी वेदना ही नकोशी असते. परंतु, तरीही मासिक पाळी चुकली तर त्या चिंताग्रस्त होतात, हे स्वाभाविक आहे. सध्याची तणावग्रस्त जीवनशैली, आहाराच्या अनिश्‍चित वेळा, धावपळ आणि लठ्ठपणा यामुळेही पीसीओएस ची समस्या उद्भवू शकते.

पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम (पीसीओएस)

हार्मोनल डिसऑर्डर: अंडाशयाच्या कामांवर परिणाम होतो

अंडाशयाला सूज येणं

परिपक्व बीज तयार न होणं

अनियमित मासिक पाळी

अंगावर व चेहर्‍यावर पुरळ

चेहर्‍यावरील / शरीरावरचे केस

मधुमेहाची समस्या असणं

लठ्ठपणा


2019 पर्यंतच्या आकडेवारीनुसारः- भारतातील महिलांपैकी 3.7% ते 22.5% महिला त्रस्त

जाणून घ्या पीसीओएस म्हणजे काय?

पीसीओएसमध्ये, अंडाशयात सिस्ट असू शकतात आणि शरीरात नर संप्रेरक देखील जास्त प्रमाणात होते. याचा परिणाम अनियमित पाळीवर होऊन वंधत्व येऊ शकते. प्रजोत्पादक वयाच्या 10 ते 15 महिलांपैकी एक महिलेमध्ये ही समस्या दिसून येते. अनुवांशिकता, अति-ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह यामुळे ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांपैकी शहरात राहणार्‍या महिलांमध्ये हा त्रास जास्त दिसून येतो. पीसीओएसबद्दल महिलांमध्ये अद्यापही जागरूकतेचा अभाव आहे. त्यामुळे जोवर गर्भधारणेत अडचण येत नाही तोवर याकडे दुर्लक्ष केलं जाते.

उपचार

योग्य आहारपद्धती आणि जीवनशैलीत बदलावर केल्यास हार्मोनल असंतुलन सुधारता येऊ शकतं. याशिवाय, मधुमेहावरील अँटी-डायबेटिक औषधे किंवा मौखिक गर्भनिरोधक गोळ्या वापरुन इन्सुलिन प्रतिरोधक औषधोपचार केला जातो, ज्यामुळे आवश्यक मादी हार्मोन्स उपलब्ध होतात आणि पुरुष संप्रेरकांचे विमोचन कमी होते. याशिवाय औषधोपचाराद्वारेही पीसीओएस या समस्येवर मात करू शकतो.

स्टेम सेल थेरपी औषधावर आधारित थेरपीपेक्षा वेगळे कसे आहे?

डॉ. महाजन स्पष्टीकरण देतात, ही उपचारपद्धती आपल्या शरीरात आधीच अस्तित्वात असलेल्या पेशींच्या वापराशी संबंधित आहे. जे वेगवेगळ्या अवयवांचे आणि ऊतींचे कार्य दुरुस्त आणि देखरेखीसाठी कार्य करतात. हे पेशी इतर पेशींची कार्ये अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास उत्तेजित करतात. या थेरपीद्वारे आम्ही अंडाशयापासून अंडी योग्यप्रकारे विकसित करतो. शरीरातील पेशी, वाढीचे घटक आणि संबंधित पेप्टाइड्स एकत्रितपणे आजार झालेल्या वातावरणास सुधारित करण्यासाठी आणि संतुलित निरोगी झोन तयार करण्यासाठी हे शक्य आहेत. या थेरपीमुळे एंडोमेट्रियम (गर्भाशयाच्या अंतर्गत अस्तर) पुनरुत्पादित केले जाऊ शकतात. कारण मेन्स्चिमल पेशी नूतनीकरण करण्यास आणि इतर पेशींच्या प्रकारांमध्ये भिन्नता करण्यास सक्षम असतात.”

“स्टेम सेल थेरपीद्वारे योगा आणि विशिष्ट व्यायाम यावरही भर दिला जात आहे. एकत्रितपणे करण्यात येणार्‍या उपचारांमुळे निश्‍चितच मदत मिळतेय. या उपचाराचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे”, असेही डॉ. महाजन म्हणाले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट