Breaking News
गिरण्यांच्या जागेवर माॅल, टाॅवर उभे राहिलेत, गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे; उद्धव ठाकरे कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मैदानात
गिरणी कामगारांच्या 14 संघटनांनी एकत्रित स्थापन केलेल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आज आझाद मैदान येथे झालेल्या गिरणी कामगार लॉंग मार्च सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.
Uddhav Thackeray: गिरण्यांच्या जागेवर टॉवर उभे राहिले आहेत. मात्र या प्रक्रियेमध्ये गिरणी कामगार मात्र बेघर झाला आहे. शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? असा आरोप आमच्यावर केला जातो. मात्र मी गिरणी कामगारांना घरं दिली असती. धारावीच्या माध्यमातून अदानीला आंदण दिलं जात आहे, तशीच धारावीत गिरणी कामगारांना घरं द्या अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आज (7 जुलै) उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या आंदोलकांची भेट घेत गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनलाही भेट दिली.
या सर्व पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, देवनार डम्पिंग ग्राउंडवर अदानीने टॉवर उभारले तरी काही हरकत नाही. त्यांना तिथं टॉवर हवं तर करुन द्या. विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की शिक्षकांना आम्ही न्यायासाठी सोबत असल्याचे वचन दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. कामगारांचा संप अजूनही तांत्रिक दृष्ट्या सुरू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदी सक्ती विरोधात बोलताना ते म्हणाले की अशा प्रकारे सक्ती करणाऱ्यांना विरोध केला पाहिजे. मीरा-भाईंदरमध्ये जो प्रकार झाला तो संतापजनक असल्याचेही त्यांनी सांगितलं. सकाळी ट्रेनमधून येताना देखील दादागिरी सहन करावी लागत असल्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे असंतोषाचा स्फोट झाला तर काय? अशी विचारणा त्यांनी केली.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रकार आहे का? त्यांनी सावध राहायला पाहिजे असे म्हणाले. गायकवाडची स्टाईल ही शिवसेना स्टाईल नसून संजय गायकवाड एसंशि असल्याचे ते म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे