Breaking News
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता फक्त या प्रवाशांनाच मिळणार खालची सीट, रेल्वे मंत्र्यांनी सांगितले कारण
भारतासारख्या मोठ्या देशात रेल्वे हा प्रवासाचा सर्वसामान्य आणि परवडणारा मार्ग मानला जातो. दररोज कोट्यवधी नागरिक रेल्वेने प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये लोअर बर्थची मागणी नेहमीच जास्त असते. यामागचं कारण म्हणजे या बर्थवर चढण्याचा त्रास नसतो, सामान सहज ठेवता येतं, आरामात बसता येतं आणि स्टेशन आलं की पटकन उतरणं शक्य होतं.
आता मात्र रेल्वे मंत्रालयाने लोअर बर्थच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ही सुविधा ठराविक प्रवाशांनाच मिळणार आहे. नेमका काय आहे हा नवीन नियम, याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. प्रवासादरम्यान लोअर बर्थवर बसणे आणि झोपणे सोयीचे मानले जाते, म्हणूनच अनेक प्रवासी यासाठी आग्रह धरतात. मात्र आता रेल्वे प्रशासनाने ठराविक गटासाठी हे आसन राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री वैष्णव यांच्या मते, वयोवृद्ध नागरिक, महिलांना आणि दिव्यांग प्रवाशांना लोअर बर्थ प्राधान्याने दिला जाईल. या प्रवाशांना जास्तीत जास्त सोय होईल, यासाठी हे आसन त्यांच्या नावावर राखीव ठेवण्यात येणार आहे.
लोअर बर्थसाठी आता विशेष प्रवाशांना मिळणार प्राधान्य
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार, ट्रेनमधील लोअर बर्थ आता ठराविक प्रवाशांच्या गटासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात अशा प्रवाशांना होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
खालील प्रवाशांना लोअर बर्थ मिळण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे
सर्व प्रवाशांना लोअर बर्थ देणे शक्य नाही, रेल्वे मंत्रालयाचा खुलासा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टपणे सांगितले की, लोअर बर्थची संख्या ठराविक आणि मर्यादित असल्यामुळे प्रत्येक प्रवाशाला ती देणे शक्य नसते. त्यामुळे ज्यांना खरोखरच या आसनांची गरज आहे, अशा प्रवाशांना प्राधान्याने लोअर बर्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक कोचमध्ये किती लोअर बर्थ उपलब्ध?
रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात स्पष्ट केले आहे की, दिव्यांग प्रवाशांना नेहमीच अग्रक्रम दिला जातो. त्यांच्या सोयीसाठी स्लीपर कोचमध्ये 2 आणि थर्ड एसी/इकोनॉमी कोचमध्ये 4 लोअर बर्थ निश्चित आरक्षित ठेवले जातात, जेणेकरून त्यांना प्रवास अधिक सुलभ होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे