Breaking News
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आषाढी एकादशीनिमित्त वारकरी सांप्रदायाचे केळी व लाडू वाटप करून स्वागत!
मुंबई, दादर - आषाढी एकादशीच्यानिमित्ताने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (प्रणित) अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्यातर्फे वारकरी संप्रदायाचे हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी भोईवाडा नाका, दादर येथील शेअर टॅक्सी स्टँडवर केळी आणि लाडूंचे वाटप करण्यात आले.
हे सेवाकार्य भोईवाडा शेअर टॅक्सी कमिटी व सर्व सभासदांच्या सौजन्याने पार पडले. वारकऱयांच्या सेवेसाठी उभारलेल्या या स्वागत केंद्रात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या अनेक पदाधिकाऱयांनी सक्रिय सहभाग घेतला. या सामाजिक उपक्रमामुळे मनसे वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी वारकऱयांमध्ये आपुलकीचं नातं निर्माण केलं असून, सामाजिक भान राखत वारकरी परंपरेला मान देण्याचा एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाचे नेतृत्व खालील पदाधिकाऱयांनी केले: संजय नाईक - अध्यक्ष, आरिफ शेख - सरचिटणीस, पोपटराव जानकर - सरचिटणीस (टॅक्सी विभाग), सुहास शेंडकर (बाळा) - उपाध्यक्ष वाहतूक सेना / अध्यक्ष शाखा क्र. 206, प्रमोद नकाशे - विभाग संघटक वाहतूक सेना / अध्यक्ष शाखा क्र. 201, नंदु चिले - उपाध्यक्ष, संतोष नलावडे - विभाग अध्यक्ष, चेतन पेडणेकर - उपविभाग अध्यक्ष (मनविसे), नंदु घाडीगांवकर - उपविभाग सचिव, विनायक खोपकर - शाखा अध्यक्ष (202), गोपाळ डामरे - प्रभाग सचिव (202),
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर