Breaking News
मुंबईत सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालयांच्या वेळा बदलणार? मध्य रेल्वेचं मोठं पाऊल
लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सकाळी ऑफिस सुरू होण्याच्या वेळत आणि संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीमुळे अनेकदा दुर्घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने मोठं पाऊल उचललं आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील जवळपास 800 शासकीय आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यासंदर्भात एक पत्र पाठवले आहे.
मुंबईतील सरकारी आणि खासगी कार्यालये, बँका आणि इतर बहुतांश व्यवसायिक केंद्रांमध्ये सकाळी कामकाज सुरू होते आणि संध्याकाळी संपते. या कार्यलयांमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी हे लोकलने प्रवास करतात. सर्वजण ठरलेल्या वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचतात आणि सांयकाळी घरी परतात. यामुळे सकाळी 7-10 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीमुळे ऑफिसच्या वेळा बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्य रेल्वेने मुंबईतील जवळपास 800 शासकीय आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यासंदर्भात एक पत्र पाठवले आहे. या पत्रातून या सर्व कार्यालयांना आपल्या वेळेत बदल करण्याचे आवाहन करण्यात आली आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या ठराविक वेळेत उपनगरीय लोकलमधील वाढती आणि गंभीर गर्दीची समस्या सोडवण्यासाठी हे विनंतीपर पत्र आहे. या मुद्द्यावर राज्य सरकारनेही हस्तक्षेप करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने पाठवलेल्या पत्रातून केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट कार्यालये, विविध महामंडळे, बँका, महापालिका आणि महाविद्यालये या अस्थापनांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने बदल करण्याचा विचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेच्या या आवाहनाला या कार्यलयाकंडून प्रतिसाद मिळाला तर मुंबईतील सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade