Breaking News
महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू चर्चेत आहेत. पण यावेळी त्यांचा हेतू महाराष्ट्राचे किंवा मराठी माणसाचे हित साधणे नसून, वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याचा डाव आहे. जनतेने वारंवार नाकारलेले, सर्वच ठिकाणी अपयशी ठरलेले दोघे भाऊ आता मराठी अस्मितेच्या नावाखाली पुन्हा एकदा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरा प्रश्न हा आहे की, जेव्हा यांनी स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवले, तेव्हा त्यांचा मराठी बाणा कुठे गेला होता?
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वासाठी लढा दिला. पण राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेना सोडली, तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मांडीवर बसून बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार विकले. आता पुन्हा एकदा, सोनिया गांधींच्या आदेशाने, या ठाकरे बंधूंनी हिंदू समाजात फूट पाडण्याचे कारस्थान रचले आहे. “एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे” या विचाराने हिंदू समाज आज एकवटत आहे, पण हे ठाकरे बंधूंना सहन होत नाही. त्यामुळे हिंदू समाजात फुटीरतेचे बीज पेरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मराठी माणसाच्या नावाखाली स्वार्थ
वर्षानुवर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, पण या काळात मराठी मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काय केले? मराठीच्या नावाखाली केवळ स्वतःची खिसे आणि घरे भरण्याचे काम या दोघांनी केले. सात पिढ्यांचे भले करून घेण्याचीच कामगिरी त्यांनी केली. मुंबईवर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या या नेत्यांनी मराठी माणसाच्या हितासाठी कधीच ठोस पावले उचलली नाहीत.
विजय चौधरी, प्रदेश महामंत्री
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे