Breaking News
‘ऑपरेशन सिंदूर’वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष प्रतिक्रिया
“भारतीय सैन्याने अचूकपणा, सतर्कता आणि माणुसकी दाखवली आहे. यामुळे मी आपल्या भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि सैनिकांना देशाच्यावतीने धन्यवाद देतो. सैन्याला संपूर्ण अधिकार प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानतो. आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शांचं पालन केलं आहे, जे त्यांनी अशोकवाटीका उद्ध्वस्त करताना दाखवलं होतं. आम्ही केवळ त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या निष्पापांचा जीव घेतला होता”, ऑपरेशन सिंदूर बद्दल अशी विशेष प्रतिक्रीया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर लागू करत दहशतवाद्यांचा बदला घेतला आहे. भारताने दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प उद्ध्वस्त करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. आमची ही कारवाई खूप अभ्यास करुन करण्यात आली आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सैन्य दलाच्या शैर्याला नमन करतो”, अशी भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.
भारतीय सैन्याने आपल्या अद्भूत शौर्य आणि पराक्रम दाखवत एक नवा इतिहास रचला आहे. भारतीय सैन्याने अतिशय सतर्क आणि संवेदनशीलपणे कारवाई केली आहे. आम्ही जे लक्ष्य ठरवले होते त्यांनाच टार्गेट केलं आहे. या हल्ल्यात कोणत्याही नागरिकास नुकसान न पोहोचवण्याची संवेदनशीलता भारतीय सैन्याने दाखवून दिली आहे”, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant