Breaking News
महागणपती प्रिमियर लीग (MPL - 2025) चा जोरदार थरार पुन्हा एकदा!
जिजामाता नगर- महागणपती क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी बहुचर्चित व लोकप्रिय महागणपती प्रिमियर लीग - 2025 (श्झ्थ् - पर्व 6वे) ही भव्य दिवस-रात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा यंदाही जोरदार तयारीत आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. 3 मे 2025 आणि रविवार, दि. 4 मे 2025 रोजी जिजामाता नगरच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेत स्थानिक क्रिकेटप्रेमींसह अनेक उत्साही खेळाडू सहभागी होणार असून, यावर्षीचा थरार आणखी वाढणार आहे. स्पर्धेपूर्वीची खेळाडू लिलाव प्रक्रिया शनिवार, दि. 26 एप्रिल 2025 रोजी पार पडणार असून, त्यासाठी सर्व स्पर्धक व चाहत्यांना मंडळातर्फे उपस्थित राहण्याचे खास निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच क्रिकेट सामान्यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant