Breaking News
या कारणामुळे पाकिस्तानी सीमा हैदर अजूनही आहे भारतात
पहलगाम हल्ल्यांनंतर हजारो पाकिस्तांनी नागरिकांना शोधून परत पाठवले जात आहे. मात्र तीन वर्षांपूर्वी नेपाळमार्गे भारतात बेकायदेशी प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानी सीमा हैदरला अजूनही भारतात राहण्याची परवानगी कशी देण्यात आली आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर सध्या ग्रेटर नोएडा येथे राहत आहे. तिचा बॉयफ्रेंड सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर ती सीमा सचिन मीना झाली आहे. सीमा हैदरने आता पाकिस्तानात परत जाण्यास स्पष्ट नकार देत, परत पाठवल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे.
मैं पाकिस्तान की बेटी थी, लेकिन अब बहू भारत की हूं। मैं पाकिस्तान नहीं जाना चाहती, इसलिए मुझे यहीं रहने दिया जाए। मैं सचिन की शरण में हूं और इनकी अमानत हूं।‘ असे आवाहन करत सीमा हैदरने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि स्वतःसाठी सवलती मागितल्या आहेत.
सीमाचे वकील एपी सिंह यांचा दावा आहे की, पहलगाम हल्ल्यानंतर तयार केलेल्या पाकिस्तानींच्या यादीत सीमाचे नाव नाही. दीड महिन्यांपूर्वीच सीमाने मुलीला जन्म दिला आहे. ही मुलगीच आता सीमासाठी संरक्षण कवच ठरली आहे. मुलीला जन्माने भारतीय नागरिकत्व मिळत असल्याने त्या कारणास्तव आता सीमा कायदेशीर आधार घेत भारतात मुक्काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे.सीमा तीन वर्षांपूर्वी बेकायदा भारतात आली तेव्हा देखील तिच्यावर कठोर कारवाई झाली नव्हती. समाज माध्यमांनी तिच्या मुलाखतींचा सुळसुळाट करत सहानभूतीची लाट निर्माण केली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर