Breaking News
काश्मिरमधील ४८ पर्यटनस्थळे बंद; गुप्तचर संस्थांच्या सल्ल्याने जम्मू-काश्मीर सरकारचा निर्णय
जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षेच्या कारणामुळे ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरने गुप्तचर संस्थांच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगामनंतर आणखी एक हल्ल्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी वर्तवली होती.
युसमार्ग, तूस मैदान, दूधपात्री, अहरबल, कौसरनाग/कौसरनाग, बांगस, कारीवान, बांगस व्हॅली, वुलर/वाटलाब, रामपोरा आणि राजपोरा, चेहर, मुंडीज-हमाम-मारकूट, सनफॉल, सनफॉल, सनफॉल. वेरीनाग गार्डन, सिंथन टॉप, मार्गंटॉप, आकड पार्क, हब्बा खातून पॉइंट, बाबरेशी, रिंगवली, गोगलदरा, बडेरकोट, श्रुंझ वॉटरफॉल, कमनपोस्ट, नंबलन वॉटरफॉल आदी ठिकाणांचा त्यात समावेश आहे. शिवाय गुलमर्ग, सोनमर्ग आणि तलाव यासारख्या संवेदनशील भागात सुरक्षा दलांकडून सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिसांच्या स्पेशल ऑप्स ग्रुपचे फिदायीन विरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे