Breaking News
नेरळ येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा!
नेरळ : भक्ती रेसिडेन्सी, कोलारे गाव, नेरळ येथील होळी उत्सव ह्या वर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. या उत्सवात स्थानिक महिलांचा सहभाग अतिशय लक्षणीय होता. रंगांच्या खेळात महिलांनी एकत्र येऊन उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे (पारंपारिक गाणे, खेळ खेळून) आयोजन करून उत्सवाची रंगत वाढवली. यावेळी सर्व वयाच्या नागरिकांनी एकत्र येऊन होळी खेळली आणि आपसात आनंद साजरा केला. विशेषत: महिलांनी विविध पारंपारिक पोशाखात होळी साजरी केली आणि एकमेकांवर रंग उधळून एकतेचा संदेश दिला. पुढील वर्षी सुध्दा अधिक मोठ्या प्रमाणात होळी उत्सव साजरा करण्याची आशा व्यक्त करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade