Breaking News
आधारकार्डसोबत लिंक होणार मतदान ओळखपत्र
नवी दिल्ली - देशातील निवडणूका पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. निवडणूक आयोगाने आता प्रत्येक मतदारांचे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि घटनेमधील तरतुदींचा दाखला देत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता प्रत्येक व्यक्तीला आपलं मतदान ओळखपत्र हे आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक असणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहसचिव होते. त्याबरोबच विधिमंडळाचे सचिव होते. या बैठकीत अनेक तज्ज्ञही उपस्थित होते. या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, आधारकार्डसोबत मतदाता नोंदणी क्रमांक म्हणजेच जो EPIC नंबर लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant