NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

६३ महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा


मुंबई-२ केंद्रातून "मोक्ष"


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ''मोक्ष'' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच माणूस फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या ''द फिलिंग पॅराडॉक्स'' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-२ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-


सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा या संस्थेच्या 'हायब्रीड' या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक रमाकांत जाधव (नाटक- मोक्ष), द्वितीय पारितोषिक डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- मोक्ष), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक-१९६० रोजी), नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रदीप पाटील (नाटक-मोक्ष) द्वितीय पारितोषिक केतन दुधवडकर (नाटक- रेड अंब्रेला), रंगभूषा प्रथम पारितोषिक वासुदेव आंब्रे (नाटक- जगज्जेता), द्वितीय पारितोषिक उल्लेश खंदारे (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक महेंद्र कुरघोडे (नाटक- मोक्ष) व नेहा अष्टपुत्रे (नाटक- पूर्णविराम), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शिवानी पेडणेकर (नाटक- हायब्रीड), प्रेरणा खेडेकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), तेजश्री दाभोळकर (नाटक- म्याडम), भारती परमार (नाटक- मोक्ष), प्रथमेश भाट (नाटक-मोक्ष), डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स), अक्षय भोसले (नाटक - शोकांतिकेची रात्र), निनाद चिटणीस (नाटक- साती साती पन्नास)


दि. ६ डिसेंबर, २०२४ ते १८ डिसेंबर, २०२४ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. संजय दखणे, श्री. संजय कुळकर्णी आणि श्रीमती अर्चना कुबेर यांनी तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले. 


सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट