NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्राचे २३ डिसेंबर रोजी मुंबईत उद्घाटन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्र २३ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.


स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-३ केंद्रावर सुरू होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध २० नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.


*स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:*


सोम. २३ डिसें. २०२४, सायं. ७ वा. कॅनिबल लेखक : डॉ. तृप्ती झेमसे दिग्दर्शक : अभिषेक भगत टाऊन लायब्ररी, नवी मुंबई

मंगळ, २४ डिसे. २०२४, सायं. ७ वा. मोक्ष लेखक: महेंद्र कुरघोडे दिग्दर्शक : विराज नारायण नारिंग्रेकर स्टेट बैंक ऑफ इंडिया, मुंबई मेट्रों सर्कल, मुंबई

शुक्र. २७ डिसें. २०२४, स. ११:३० वा. ज्योतिषाचे तीन तेरा लेखक व दिग्दर्शक : राजेश मयेकर स्वयंदीप प्रतिष्ठान, मुंबई

शुक्र. २७ डिसें. २०२४, सायं. ७ वा. मराठी माणूस नॉट अलाऊड लेखक व दिग्दर्शक : शशांक वामनोलकर सम्यक कालांश प्रतिष्ठान, मुंबई

शनि. २८ डिसें. २०२४, स. ११:३० वा. घर त्या तिघांचं लेखक व दिग्दर्शक : आबा पेडणेकर साई कला व सांस्कृतिक ट्रस्ट, मुंबई

शनि. २८ डिसें. २०२४, सायं. ७ वा. द हंग्री क्रो लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शक : सुरेश गांगुर्डे मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन, मुंबई

सोम. ३० डिसें. २०२४, स. ११:३० वा. कायाप्पाचा पाडा लेखक: देवेंद्र काळसेकर दिग्दर्शक : नम्रता काळसेकर सह प्रमुख कामगार अधिकारी, पूर्व उपनगरे बृहन्मुंबई म.न.पा.

सोम. ३० डिसें. २०२४, सायं. ७ वा. गलती से मिस्टेक लेखक व दिग्दर्शक : प्रतिमा कांबळे प्रभात मित्र मंडळ, मुंबई

मंगळ. ३१ डिसें. २०२४, स. ११:३० वा. तुझ्या रुपात मी... लेखक व दिग्दर्शक : संदेश जाधव प्रवेश कला क्रीडा मंच, मुंबई

बुध. १ जाने. २०२५, स. ११:३० वा. मीठ आणि भुसा लेखक व दिग्दर्शक : विठ्ठल सावंत पटेलवाडी मित्र मंडळ, मुंबई

बुध. १ जाने. २०२५, सायं. ७ वा. वा गुरु लेखक : डॉ. चंद्रशेखर फणसळकर दिग्दर्शक : गिरीश मयेकर मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्टस क्लब, मुंबई

गुरु. २ जाने. २०२५, स. ११:३० वा. इम्युनिटी (द व्हाईस ऑफ टॉलरन्स) लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शक : महेंद्र दिवेकर मोरगा प्रतिष्ठान, मुंबई

गुरु. २ जाने. २०२५, सायं. ७ वा. इन्शाअल्ला लेखक: चेतन दातार दिग्दर्शक : सुशील इनामदार बृहन्मुंबई पोलीस कल्याण निधी, मुंबई

शुक्र. ३ जाने. २०२५, स. ११:३० वा. वारुळ लेखक : राजेंद्र पोळ दिग्दर्शक : मिलिंद सावंत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई

शुक्र. ३ जाने. २०२५, सायं. ७ वा. संघर्ष जगण्याचा.. लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा लेखक: युवराज संतोष दिग्दर्शक: सुभाष गोतड कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई

शनि. ४ जाने. २०२५, स. ११:३० वा. धुमशान लेखक: मनोहर कदम दिग्दर्शक: आत्माराम धर्णे अरुणोदय नगर मित्र मंडळ, मुलुंड (पूर्व)

शनि. ४ जाने. २०२५, सायं. ७ वा. स-टायर लेखक: डॉ. मंगेश क्षीरसागर दिग्दर्शक : अशोक साळवी अनुराग, मुंबई

रवि. ५ जाने. २०२५, सायं. ७ वा. ढाई अक्षर प्रेम के लेखक व दिग्दर्शक : डॉ. शिरीष ठाकूर अमृत कलश फाऊंडेशन, मुंबई

सोम. ६ जाने. २०२५, सायं. ७ वा. मी तर बुआ अर्धा शहाणा लेखक : राजा पारगावकर दिग्दर्शक : दशरथ कीर आकांक्षा फाऊंडेशन, मुंबई

बुध. ८ जाने. २०२५, सायं. ७ वा. ओअॅसिस लेखक : इरफान मुजावर दिग्दर्शक : सुगत उथळे सचिवालय जिमखाना, मुंबई


सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यावतीने विकास खारगे (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच विभीषण चवरे संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नाट्य संस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच https://www.rangabhoomi.com/tickets/63rd-haushi-marathi-rajya-natya-spardha/ "रंगभूमी डॉट कॉम" ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट