सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रश

         कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं असून, या हेलिकॉप्टर मध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. ज्यामध्ये भारतीय संरक्षण दलाचे  प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा सुद्धा समावेश होता. हवामानामध्ये झालेल्या बिघाडामुळे त्यांचे हेलिकॉप्टर क्रश झाल्याची बातमी हवाई दलाने दिली आहे.   

         तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे झालेल्या अपघातामध्ये, बिपीन रावत यांच्या पत्नी समवेत, अजून ९ अधिकारी सुद्धा होते. या अपघातात ३ जखमी तर ४ लोकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. जखमींना वेलिंग्टन बेसमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. 


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट