मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कळंबोलीत रक्तदान शिबिर संपन्न

आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन  

पनवेल : रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत 4 फेब्रुवारी 2021 वाहतूक शाखा कळंबोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत रक्त संकलन केले गेले. तसेच जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी केली गेली. त्यामध्ये निर्माण डायग्नोस्टिक सेंटर यांच्या नियोजनाखाली प्रथमोपचार, सी. बी. सी. चेक, रक्तदाब,टेम्परेचर, शुगर, ऑक्सिजन, इतर आजारांची मोफत तपासणी करुन तज्ज्ञांकडून मोफत सल्ला दिला गेला. तसेच प्रत्येक तपासणी करणार्‍या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. अपघातात रक्त सांडवून जीव गमावण्या पेक्षा  रक्तदान करणे कौतुकास्पद ठरेल असे मत आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल विभागीय पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कर्‍हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, कळंबोली वाहतूक पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, अभिजीत मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस प्रशांत पाटील, नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड, नगरसेवक प्रमोद भगत, माजी नगरसेवक शिवदास कांबळे तसेच पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, स्थानिक विविध संघटनांचे पदाधिकारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट