Breaking News
दिंडी चालली शिवाजी विद्यालयाच्या परंपरेची ...
अभ्युदय नगरमधील शिवाजी विद्यालयाचे विश्वस्त अधिराज आणि गौरव लोकेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यालयाच्या छोट्या छोट्या वारकऱयांनी मोठ्या शिस्तीत आणि भक्तिभावाने पांडुरंगाचा नामजप करत काळाचौकी विभागात दिंडी काढली. शाळेच्या शिक्षर्गाने सुद्धा पारंपारिक वेश धारण करून दिंडीमध्ये हरिनामाचा जयघोष करत सहभाग घेतल्याने विद्यार्थी आनंदात होते.
कॅसल ब्लॅक या शिवाजी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या चिमुकल्यांचा सहभाग लक्षणीय होता. विठ्ठल रखमाई च्या वेशात चिमुकली जोडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. पाऊस पाण्याची तमा न बाळगता भक्तीचा नादमय प्रवास संपूर्ण परिक्रमेदरम्यान अखंडीत पणे प्रवाहित होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar