Breaking News
SBI कडून 96 हजार कोटींच्या कर्जवसुलीवर पाणी; बँकेने कर्जबुडव्यांची नावे जाहीर करण्यास नकार
मुंबई | (NCLT) भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून तब्बल 96 हजार 588 कोटी रुपयांच्या कर्जवसुलीवर कायमचे पाणी पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (NCLT) SBI ने 279 प्रकरणे पाठवली होती. एकूण दावे होते 1 लाख 44 हजार 967 कोटी रुपये. त्यापैकी केवळ काही रक्कमच वसूल करण्यात यश आले, उर्वरित मोठी रक्कम बुडीत कर्जात गेली आहे.
या प्रकरणात अनेक मोठ्या कंपन्यांनी 100 कोटींपेक्षा जास्त कर्ज बुडवलं असूनही, SBI या कंपन्यांची नावे जाहीर करण्यास नकार देत आहे. ही माहिती बँकेचे भागधारक विवेक वेलणकर यांनी बँकेकडून मागवली होती. SBI ने आकडेवारी दिली असली, तरी कर्जबुडव्यांची यादी गोपनीय ठेवली आहे.
सरकार आणि बँका ज्या वेगाने छोट्या कर्जदारांविरोधात वसुलीची कारवाई करतात, तेवढ्याच तत्परतेने मोठ्या थकबाकीदारांविरोधात कारवाई न केल्याचा आरोप वारंवार होत आहे.96 हजार कोटी रुपये बुडाल्यानंतरही त्या कंपन्यांची नावं न सांगणे ही पारदर्शकतेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar