Breaking News
अर्थमंत्र्यांच्या हस्ते होणार पंतप्रधान इंटर्नशिप स्कीमचे (PMIS) ॲप लॉन्च
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि.१७) पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) ॲप लॉन्च करणार आहेत. या ॲपमुळे तरुणांना इंटर्नशिपसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे. यासोबतच त्या कोलकातामध्ये पहिले सुविधा केंद्र सुरू करणार आहे. हे केंद्र कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांनी तयार केले आहे. येथे तरुणांना इंटर्नशिपबाबत माहिती व मदत मिळणार आहे.भारतीय उद्योग महासंघ त्यांच्या 47 मॉडेल करिअर केंद्रांमध्ये अशा सुविधा डेस्क तयार करेल, जिथे इंटर्नशिपशी संबंधित माहिती दिली जाईल. हे मोबाईल ॲप भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओइन्फॉरमॅटिक्स (BISAG) ने तयार केले आहे. ही संस्था आधीच या योजनेचे पोर्टल चालवत आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणकापेक्षा मोबाईल फोनवर अर्ज करणे सोपे होणार आहे. त्यामुळे हे ॲप तयार करण्यात आले आहे.2024-25 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) जाहीर करण्यात आली होती. पाच वर्षांत 1 कोटी तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
2024-25 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) जाहीर करण्यात आली होती. पाच वर्षांत 1 कोटी तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar