Breaking News
भगवान परशुरामांची भूमिका साकारणार हा अष्टपैलू अभिनेता
मुंबई - उरी’ सिनेमातील सैन्य अधिकारी, सरदार उधम सिंग यांच्यावरील बायोपिक आणि ‘सॅम बहादूर’ या बायोपिकमधून अभिनेता विकी कौशल याने आपल्या अभिनयानं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक भूमिकेसाठी, ते पात्र पडद्यावर हुबेहूब साकारण्यासाठी विकी कौशल जी मेहनत घेतो. काही दिवसांतच चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘छावा’या चित्रपटातून विकी ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांची भूमिका साकारणार आहे. त्याची ही भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यानंतर आता विकी कौशल एका महत्त्वाची पौराणिक भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता विकी कौशलच्या ‘महाअवतार’ या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. त्यात विकी कौशल भगवान परशुरामांची भूमिका साकारणार आहे.
निर्माता दिनेश विजयनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यात विकी हा परशुराम या भूमिकेत दिसणार आहे. परशुराम हे विष्णुचा सहावा अवतार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘महावतार’ आहे. या चित्रपटाची घोषणा करतानाच्या या अनाउंसनेंट व्हिडीओमध्ये परशुरामच्या भूमिकेत विकी कौशलचा लूक रिव्हिल केला आहे.
पोस्टरमध्ये विकीच्या लूकसोबत प्रदर्शनाच्या तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे. ‘महावतार’ क्रिसमस 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पोस्टमध्ये सांगितलं आहे की या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक असतील त्यांनीच ‘स्त्री 2’ बनवला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर