Breaking News
ते पुन्हा आले!ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड
वॉशिग्टन डीसी, - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला असून, ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना हरवून विजय मिळवला आहे. ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी रस्त्यावर उत्साहात जल्लोष केला. त्यांच्या पराभवाने जो बायडेन समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ट्रम्प यांनी आपल्या विजयाच्या भाषणात अमेरिकेला मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांनी केलेल्या भाषणांतून अनेक प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली होती, ज्यामुळे त्यांना पुन्हा लोकांनी समर्थन दिले. जगभरात या निवडणुकीचे पडसाद उमटत आहेत, आणि अनेक नेत्यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. याआधी २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. मात्र २०२० च्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील पाम बीच इथं समर्थकांशी संवाद साधला. यावेळी अमेरिकेसाठी हे सुवर्णयुग असल्याचं ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले की, आतापर्यंतचं हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन आहे. आम्ही आपल्या देशाला पुन्हा एकदा व्यवस्थित करण्यासाठी मदत करू. देशाला मदतीची गरज आहे. सीमा नीट करू. आज आपण इतिहास घडवला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुवर्णयुग सुरू कऱण्याची शपथ घेताना म्हटलं की, हे एक असं आंदोलन होतं जे याआधी कधीच कुणी पाहिलं नाही. खरं सांगायचं तर मला वाटतं की आतापर्यंतचं हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन होतं. या देशात यापेक्षा मोठं कधी काही झालं नसावं. आम्ही आपल्या देशाची मदत करणार आहे. आपल्याकडे एक असा देश आहे ज्याला खूप मदतीची गरज आहे. आपण असे अडथळे पार केले ज्याचा कुणीही विचार केला नव्हता. आता हे स्पष्ट आहे की आपण विजय मिळवला आहे असंही ट्रम्प म्हणाले्.
हा एक असा राजकीय विजय आहे जो आपल्या देशाने याआधी कधी पाहिला नाही, असा कोणताच विजय नाही. मी अमेरिकेच्या लोकांचा निवडून आलेला ४७ वा राष्ट्राध्यक्ष आणि ४५ वा राष्ट्राध्यक्ष बनवल्याबद्दल तुमचे आभार मानतो. मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढेन. प्रत्येक दिवशी मी तुमच्या प्रत्येक श्वासासाठी लढेन. जोपर्यंत भक्कम, सुरक्षित आणि समृद्ध अमेरिका होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसू शकणार नाही असंही ट्रम्प म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे