मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आर आर आबांनी माझा केसाने गळाच कापला होता

आर आर आबांनी माझा केसाने गळाच कापला होता

सांगली - उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज तासगावात रोहित पाटलांवर हल्लाबोल करीत आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता असा आरोप केला. सांगली जिल्ह्यातील तासगावात माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी ते बोलत होते. तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघाची वाईट अवस्था आहे. इथल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सूतगिरणी बंद आहे. बाजार समितीची चौकशी सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. मतदारसंघात एकही संस्था उभी नाही.

या ठिकाणी केवळ भाषणं करून लोकांचं पोट भरणार नाही. तर नेतृत्वात धमक असावी लागते, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटलांवर केला. शिवाय सिंचन घोटाळ्याच्या तथाकथित प्रकरणात आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला. त्यांनीच माझी ‘ओपन इंक्वायरी’ सुरू करण्याचा फाईलवर सही केली, असाही घणाघाती आरोप पवार यांनी यावेळी केला.

तासगाव – कवठेमहांकाळचे महायुतीचे उमेदवार, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर तासगाव शहरातून पदयात्रा आणि जाहीर सभा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट