Breaking News
मराठा आरक्षणाचा लढा जरांगे यांनी गब्बर मराठ्यांच्या दारात नेला
पुणे - मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील गरीब मराठयांकरिता आरक्षणाचा लढा सुरू केला होता पण हा लढा त्यांनी याच समाजातील गब्बर असलेल्या मराठ्यांच्या दारात लढा नेऊन ठेवला अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे , पुण्यात बहुजन वंचित आघाडी यांच्या वतीने ‘ जोषाबा ‘ या जाहीरनाम्याचे अनावरण आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील विधानसभा निवडणुकांना आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. असे असताना राष्ट्रीय पक्षांनी अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नसताना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने ) यात आघाडी घेत आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक घोषणा करत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना आश्वासंने दिले आहेत.
जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल, बोगस आदिवासी दाखले रद्द करू आणि हक्काच्या लोकांना त्याचे हक्क देऊ, अनुसूचित जाती-जमातीच्या उद्धारासाठी प्रयत्न करू. तर भटक्या विमुक्त समुदाय या संदर्भातील धोरण आणि जात जनगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात येईल. असे अनेक मुद्दे मांडत प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना वंचितला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मतदारराजा वंचितची या जाहीरनाम्यावर विश्वास दर्शवत प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांना साथ देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant