Breaking News
पहिल्या ‘विश्वसुंदरी’ चे निधन
कॅलिफोर्निया - जगातली पहिली विश्वसुंदरी किकी हॅकन्सन (९५) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांनी विश्वसुंदरी हा किताब जिंकला होता. कॅलिफोर्निया या त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किकी हॅकन्सन यांचा मृत्यू झोपेतच झाला. त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की, “किकी हॅकन्सन यांना ४ नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच देवाज्ञा झाली.” त्यांच्या मृत्यूची घोषणा इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करण्यात आली आहे.
किकी हॅकन्सन यांचा मुलगा ख्रिस अँडरसन यांनी म्हटलं आहे माझी आई आज जगात नाही, ती खूप दयाळू, प्रेमळ आणि एखाद्या मैत्रिणीप्रमाणे होती. तिची विनोदबुद्धी खूप चांगली होती तसंच ती अत्यंत मोठ्या मनाची होती. तिने जे संस्कार आमच्यावर केले आहेत त्यामुळे आम्हाला कायमच तिची आठवण येत राहिल.”
किकी हॅकन्सन यांनी १९५१ मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा त्या जिंकल्या. किकी हॅकन्सन यांनी जिंकलेल्या मिस वर्ल्ड या किताबामुळे या पुरस्काराची परंपरा जगात सुरु झाली. मिस वर्ल्ड हे या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या पोस्टवरुन किकी हॅकन्सन यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. आम्ही सगळे किकी हॅकन्सन यांच्या दुःखात सहभागी आहोत. आमचं प्रेम, सद्भवाना हे कायमच किकी हॅकन्सन यांच्या कुटुंबासह असेल अशी पोस्ट या पेजवरुन कऱण्यात आली आहे. किकी हॅकन्सन यांनी मिस वर्ल्ड हा किताब जिंकण्याआधी मिस स्वीडन हा किताबही जिंकला होता. १९५१ मध्ये पहिल्या ‘मिस वर्ल्ड’ सौंदर्य स्पर्धेतील स्पर्धकांनी ‘बिकिनी’ परिधान केली होती. त्याचीही चर्चा त्या काळात झाली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर