Breaking News
एकात्मिक पद्धतीने शेती करत मरसुळ झाले भाजीपाल्याचे गाव
परभणी - परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या मरसुळ गावातील शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने भाजीपाला पिके घेत आर्थिक प्रगती केलीच आहे शिवाय गावाची भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. मरसुळ हे साधारण 400 लोकवस्ती असलेले गाव आहे,या गावाच्या जवळ पूर्णा,वसमत,नांदेड शहर जवळ आसून रेल्वे आणि इतर दळणवळणाची सुविधा आहेत,शहरातील भाजीपाल्याची गरज ओळखून भेंडी,वांगी, टोमॅटो,मिरची, कांदा,पालक अशी भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली ती आज ही सुरू आहे.
यासोबतच मोसंबी, संत्रा,लिंबू,अशी फळबागाही आहेत यातून दररोज स्वतः शेतकरी भाजीपाला शहरात घेऊन स्वतः विक्री करतात त्यामुळे नगदी पैसा हातात मिळतोय.या अर्थकरणारून आपले जीवनमान उंचावण्यासाठी मदत होत यासोबत भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
याच गावातील चांदु शिंदे या शेतकऱ्याने भाजीपाला उत्पादनालां शासनाच्या विविध योजनांची जोड दिली. कोरडवाहू शेतीत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर आणि NHM अंतर्गत सामूहिक शेततळे घेतल्याने पाण्याची सुविधा झाली.मोठ्याप्रमाणात कांदा उत्पादनाला साठवणुकीची व्यवस्था करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ घेतल्याने बाजार भाव पाहून कांदा विक्री होत असल्याने अधिक नफा होत आहे.
भाजीपाला रोपे घरीच तयार करण्यासाठी अहिल्याबाई होळकर रोप वाटिका घेतल्याने घरीच रोपे तयार करून गावातील शेतकऱ्यांना पुरवठा केल्या जात आहे.याशिवाय कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर आणि अवजारांमुळे कमी वेळेत अधिक कामे होत आहेत.यासोबतच फळबाग योजनेतून मोसंबी,संत्रा आणि लिंबू फळबाग लागवड केली आहे.
शासनाच्या विविध योजना फायदेशीर ठरल्या आहेत यासोबत गावातील महिलांना नियमित काम मिळत आहे.
मरसुळ गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला आणि फळबाग लागवड करत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा ही लाभ घेत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घ्यावीत आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी केले. याच गावातील देवराव शिंदे यांना शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे राज्य सरकारने वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी,कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar