पनवेलमध्ये आरोग्यसेवा आपल्या दारी

जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम 

नवीन पनवेल : आरोग्यसेवा आपल्या दारी या आरोग्य सेवेचा शुभारंभ नुकताच पार पडला. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनातून आणि अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून, नगरसेविका डॉ.सौ.सुरेखा मोहकर यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून या उपक्रमाला सुरुवात केली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आवश्यक त्या ठिकाणी ज्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेने कोविडच्या पहिल्या कोरोना लाटेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून आणि शासनाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन ऑक्सिजनची पातळी आणि शरीराचे तापमान तपासून  रुग्ण तपासणी केली होती. सदरच्या आरोग्य सेवेमध्ये नागरिकांना दिलासा देखील दिला होता. सध्या येणार्‍या तिसर्‍या लाटेबद्दल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यासाठी नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून ‘आरोग्यसेवा आपल्या दारी’ या उपक्रमात आरोग्य सेविका नेमून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणातील घरोघरी जाऊन मोफत आरोग्य तपासणी करणार आहोत. यामध्ये नागरिकांच्या शरीराचे तापमान,ऑक्सीजन पातळी,ब्लड प्रेशर ,पल्स, आवश्यक असल्यास शुगर अशा प्रकारची सेवा मोफत देण्यात येणार आहे. याकरिता कोणतेही शुल्क रहिवासी किंवा पालिकेकडून आकारणार नाही. सामाजिक बांधिलकीतून आणि आपल्या पनवेल पालिकेला सहकार्य करण्यासाठी सदर उपक्रम राबवित असल्याचे माहिती प्रितम म्हात्रे यांनी दिली. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत, पनवेल शहर सहचिटणीस नंदकिशोर भोईर, युवा नेते अतुल भगत,जॉनी जॉर्ज, मंगेश अपराज, अनंत म्हात्रे, दर्शन कर्डिले, संदेश डिंगोरकर, नितीन कसाबे, विलास गायकवाड, किरण गायकवाड, किरण गोवारी, आशिष देसाई, प्रदीप शेलार, सुजित गुळवे, मारुती आर्केड सोसायटीचे रहिवासी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट