Breaking News
जगभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या २० शहरांमध्ये भारतातल्या १३ शहरांचा समावेश, हे ठिकाण पहिल्या स्थानी
मुंबई -जगभरातल्या प्रदूषणाविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार भारताची अवस्था बिकट असल्याचे दिसते आहे. जगातल्या २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं भारतातली आहेत. यात आसाममध्ये असलेलं बर्निहट शहर पहिल्या क्रमाकांवर आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी आयक्युआरच्या जागतिक एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 नुसार दिल्ली जागतिक स्तरावर सगळ्यात प्रदूषित शहर ठरलं आहे, तर भारत हा देशात जगातला पाचवा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. 2023 मध्ये भारताचं स्थान तिसऱ्या क्रमांकावर होतं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant