Breaking News
देशातील ५८ वा व्याघ्रप्रकल्प या राज्यात होणार सुरु
भोपाळ - मध्य प्रदेशमधील माधव राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील व्याघ्रप्रकल्पांची संख्या आता ५८ झाली आहे. वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आहे. देशात वाघांचे वास्तव्य असलेल्या १८ राज्यांमध्ये वाघांचे संवर्धन करण्यासाठी वने आरक्षित करण्यात आली आहेत. या व्याघ्रप्रकल्पांनी एकूण ८२ हजार ८३६ चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापले आहे.
मध्य प्रदेशमध्ये माधव राष्ट्रीय उद्यान व्याघ्रप्रकल्प जाहीर झाल्यामुळे या राज्यातील व्याघ्रप्रकल्पांची संख्या नऊ झाली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश हे राज्य देशातील सर्वाधिक व्याघ्रप्रकल्प असलेले राज्य ठरले आहे.व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांसाठी बफर आणि कोअर क्षेत्र अशी व्यवस्था केली जाते. कोअर क्षेत्रा माणसांना प्रवेश करण्यास मनाई असते. त्यामुळे वाघांचे संरक्षण होते आणि त्यांचा प्रजननाचा दर वाढतो. जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी तब्बल ७० टक्के वाघ एकट्य़ा भारतात आहेत
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant