Breaking News
आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्वसंरक्षण मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अभ्युदय नगर येथील अभ्युदय एज्युकेशन शाळेच्या हॉलमध्ये सदर प्रशिक्षणात 13 वर्षावरील मुली/महिलांनी भाग घेतला. या प्रशिक्षणात स्वसंरक्षणार्थ अनेक युक्त्या प्रशिक्षक श्री विपुल सुरा यांनी शिकवल्या. व मुलीकडून प्रात्यक्षिक देखील करून घेतली
या उपक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी काळाचौकी पोलीस स्टेशन च्या महिला अधिकारी पाटील मॅडम त्यांच्या इतर पोलीस सहकाऱ्यांसह उपस्थित होत्या. आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले, चिटणीस हेंद्री लोबो, स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष उदय पवार, निलेश निकम, पत्रकार शेखर छत्रे, सामाजिक कार्यकर्ते मिथिलेश सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा जैतपाल यांनी केले. सदरचे मोफत प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या मुलींनी आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क करावा. मुंबईतील अंधेरी व ठाणे येथील सेल्फ डिफेन्स अकॅडमी या संस्थेस मुलींची शिफारस करण्यात येईल.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी इस्रार खान, रवींद्र कदम, तुषार पाटेकर, अक्षय मोरे राजेंद्र खानविलकर आनंद घोगळे व महेंद्र रहाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant