Breaking News
या शहरातून सुटणार राज्यातील पहिली अयोध्या धाम रेल्वे
नांदेड - मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत सोडण्यात येणारी राज्यातील पहिली अध्योध्या धाम रेल्वे येत्या शनिवार ८ मार्च रोजी नांदेडहून सोडली जाणार आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री उद्या शुक्रवार ७ मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत करुन घ्यावी. तसेच अयोध्या धामला जाण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
राज्यातील नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जावून, मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्राना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना गेल्यावर्षी जुलै रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत झाली आहे. या योजनेत नांदेड येथील अध्योध्या धाम तीर्थ क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची निवड यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. तर तसेच संबंधिताना मोबाईलद्वारे संपर्क करण्यात येत आहे, तरी सर्व पात्र ज्येष्ठ लाभार्थी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant