Breaking News
कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या IITian बाबाला अटक
जयपूर - सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिल्यानंतर IITian बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभय सिंहला जयपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या लोकेशनचा मागोवा घेत जयपूरच्या रिद्धि-सिद्धि भागातील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली. तपासादरम्यान हॉटेलच्या खोलीतून गांजा आणि काही अन्य अंमली पदार्थही जप्त केले आहेत.
अभय सिंह यांनी सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी पोस्ट केल्यानंतर जयपूर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. शिप्रापथ पोलीस ठाण्याचे सीआय राजेंद्र गोदारा आणि त्यांच्या टीमने हॉटेल गाठून त्यांना ताब्यात घेतले. हॉटेल रूमची झडती घेतली असता गांजा आणि काही अन्य अंमली पदार्थ सापडले, त्यामुळे त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केल्यानंतर अभय सिंह म्हणाला की, फक्त थोडा प्रसाद (गांजा) होता. जर तुम्ही यावर केस करत असाल, तर कुंभमेळ्यात हजारो लोक गांजा घेतात, मग त्यांनाही अटक करा. सिंह यांनी भारतात हा प्रकार सामान्य असल्याचा दावा केला. पोलिस आता बाबांनी आत्महत्येची धमकी का दिली आणि त्यांच्या जवळ सापडलेले अंमली पदार्थ कुठून आले, याचा तपास करत आहेत. तसेच, त्यांच्यावर यापूर्वी कुठले गुन्हे दाखल आहेत का? हेही शोधण्याचे काम सुरू आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade