Breaking News
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड प्रमुख आरोपी
राजकीय
बीड -: वाल्मीक कराड हाच बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात केला आहे. या आरोपपत्रात वाल्मीकचा उल्लेख आरोपी क्रमांक १ असा करण्यात आला आहे. यामुळे या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड भोवतीचा कारवाईचा फास आणखीनच घट्ट झाला आहे. या आरोपपत्रात खंडणी, अॅट्रोसिटी, हत्या प्रकरणाचे एकत्रित गुन्हे आहेत. पाच साक्षीदारांच्या गोपनीय जबाबानंतर वाल्मीक कराडविरुद्ध पुरावे मिळालेत. संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीकडे आहेत. विष्णू चाटे दोन नंबरचा आरोपी आहे.
वाल्मीक कराडवर आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्या आरोप आहे. या खंडणीला विरोध केल्यामुळे त्याने आपल्या सहकाऱ्याच्या माध्यमातून संतोष देशमुख यांची हत्या केली, असे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे व जयराम चाटे हे आरोपी अटक आहेत. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल आहे. तर, कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे.
बीड शहरात कराडची दहशत असल्याचेही सीआयडीने आरोपपत्रात नमूद केले आहे. या हत्येच्या तपासात पाच साक्षीदारांनी महत्त्वपूर्ण जबाब नोंदवले असून, त्यामध्ये वाल्मिक कराड विरुद्ध ठोस पुरावे समोर आले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे