Breaking News
International space station ला गेले तडे
मुंबई - मानवाच्या अंतरिक्ष संशोधनातील मैलाचा दगड असलेल्या अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तडे गेल्याचे समोर आले असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अंतराळात असलेल्या सुनिता विल्यम्स सह इतरांविषयीही चिंता वाढली आहे. या अंतराळ स्थानकाला गेल्या काही वर्षांपासून तडे जात असून त्यात आता वाढ झाल्याने नासाही चिंतेत आहे.या संदर्भात उघड झालेल्या नासाच्या एका अहवालामुळे सर्व अंतराळवीरही धोकादायक स्थितीत असल्याचे म्हटले जात आहे.
सुनीता विल्यम्स या जूनपासून आपले सहयात्री बुच विलमोर यांच्याबरोबर अंतराळात आहेत. १५० दिवसांपासून त्या अंतराळात असून त्यांच्याविषयी विविध माध्यमातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर परतण्याची शक्यता असून आता अंतराळ स्थानक धोकादायक झाल्याच्या वृत्ताने अनेकाना त्यांच्याविषयीही चिंता वाटू लागली आहे. या आधीही सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीविषयी त्याचप्रमाणे त्या वृद्ध दिसत असल्याबद्दल जगभरातून चिंता व्यक्त होत होती. अर्थात नासाने अधिकृतरित्या अंतराळातील सर्व यात्री सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade