Breaking News
आजपासून सुरु होणार साखर कारखान्यांचा गाळप हंगाम
पुणे - राज्यातील मुख्य कृषी आधारित व्यवसाय असलेल्या साखर कारखान्यांचा यावर्षीचा ऊस गाळप हंगाम उद्यापासून सुरु होणार आहे. साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, साखर आयुक्तालयाकडे यंदाच्या गाळप हंगामात २०४ खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी गाळप परवाना मागितला होता. त्यापैकी ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. शुल्क भरला आहे, अशा कारखान्यांना गाळप परवाना दिला जात आहे. आज दुपारपर्यंत ८० आणि सायंकाळपर्यंत शंभरहून जास्त कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या मंत्री समितीच्या बैठकीत राज्यात उसाची उपलब्धता कमी असल्याच्या कारणामुळे आणि दिवाळी सणाचा विचार करून एक नोव्हेंबर ऐवजी पंधरा नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा करण्याचा निर्णय झाला होता. पण, विधानसभा निवडणुकीमुळे आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील मजूर ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात येत असल्यामुळे ऊसतोडणी मजुरांचे मतदान बुडेल. त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील महायुतीच्या उमेदवारांनी राज्य सरकारवर दबाव टाकून साखर हंगाम पंधराऐवजी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सुरू करण्याची मागणी केली होती. त्या बाबतचे पत्रही राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पाठवले होते. पण, निवडणूक आयोगाकडून कोणताही आदेश न आल्यामुळे साखर आयुक्तालयाने गुरुवारी (१४ नोव्हेंबर) दुपारपासून ऑनलाईन गाळप परवाने देण्याचे काम सुरू केले आहे.
साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, साखर आयुक्तालयाकडे यंदाच्या गाळप हंगामात २०४ खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी गाळप परवाना मागितला होता. त्यापैकी ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. शुल्क भरला आहे, अशा कारखान्यांना गाळप परवाना दिला जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar